एसटी संपाला गालबोट! कर्मचाऱ्यांत तुंबळ हाणामारी; वाहकानं नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Depot

संपकाळातील प्रवासी वाहतुकीच्‍या कारणावरुन आज सातारा आगारात कर्मचाऱ्यांच्‍या दोन गटात वाद झाला.

एसटी कर्मचाऱ्यांत तुंबळ हाणामारी; वाहकानं नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : संपकाळातील प्रवासी वाहतुकीच्‍या कारणावरुन आज दुपारी सातारा आगारात (Satara Depot) कर्मचाऱ्यांच्‍या दोन गटात वाद झाला. वादात डोक्‍यास दगड लागल्‍याने सातारा आगारातील वाहतूक नियंत्रक अमित चिकणे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजेंद्र बाबुराव पवार (रा. सातारा) यांनी संपावेळी कामावर आल्‍याच्‍या कारणावरुन विक्रम अशोक जंगम (रा. मांडवे, ता. सातारा) यांनी मारहाण केल्‍याचे पोलिस ठाण्‍यातील तक्रारीत नमूद केले आहे. दरम्‍यान, जखमी चिकणे यांची तक्रार नोंदवून घेण्‍याचे काम रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्‍यात (Satara City Police Station) सुरु होते.

शासनामध्‍ये विलीनीकरण करण्‍याच्‍या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Workers Agitation) राज्‍यव्‍यापी संप सुरु आहे. हा संप मिटावा, यासाठी राज्‍यपातळीवर अनेक बैठका झाल्‍या आहेत. बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघत नसल्‍याने संप चिघळत चालला आहे. संपावर कर्मचारी ठाम असल्‍याने महामंडळाने कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्‍या कारवाई सुरु केली आहे. त्‍यातच काही ठिकाणी कर्मचारी संघटनांमध्‍ये फूट पडत असल्‍याचेही समोर येत आहे. गेले ९ दिवस सातारा येथे शांततेत सुरु असणाऱ्या संपास गालबोट लागल्‍याची घटना घडली.

हेही वाचा: 'शरीरात रक्त आहे, तोपर्यंत BSF जवानांना भूमीत पाय ठेऊ देणार नाही'

आज सातारा आगारातील वाहक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते. पुण्‍याहून काही प्रवासी घेवून पवार हे पुन्‍हा सातारा येथे आल्‍यानंतर त्‍यांच्‍यात आणि संपकरी कर्मचाऱ्यांत वाद सुरु झाला. संप सुरु असताना प्रवासी वाहतूक का करतो, असे विचारल्‍यावरुन वाद पेटला आणि त्‍याचे पर्यवसन मारहाणीत झाले. दरम्‍यान, मारहाणीत दगड लागल्‍याने सातारा आगारातील वाहतूक नियंत्रक अमित चिकणे हे जखमी झाले आहेत. चिकणे यांना राजू पवार यानेच दगडाने मारहाण केल्‍याची माहिती त्‍याठिकाणी उपस्‍थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली.

दगड लागल्‍याने जखमी झालेल्‍या चिकणे यांच्‍यावर जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत. दरम्‍यान, राजेंद्र बाबुराव पवार (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात एक तक्रार नोंदवली आहे. यात त्‍यांनी विक्रम अशोक जंगम (रा. मांडवे, ता. सातारा) यांनी संप सुरु असताना कर्तव्‍यावर हजर झाल्‍याच्‍या कारणावरुन चापट मारत दमदाटी केल्‍याचे नमुद केले आहे. याचा तपास सहाय्‍यक फौजदार जगदाळे हे करीत आहेत.

हेही वाचा: शेख महाराजांनंतर प्रवचन देताना आणखी एका महाराजांना हृदयविकाराचा झटका

loading image
go to top