esakal | उदयनराजेंचं मोठं वलय आहे, शब्द आहे.. यावर 'राजे' काय म्हणाले, माहितीय? I Udayanraje Bhosale
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale
राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो! BJP-NCP च्या बड्या नेत्यांचे भेटीने पुन्हा एकदा सिध्द

उदयनराजेंचं मोठं वलय आहे, शब्द आहे.. यावर 'राजे' काय म्हणाले, माहितीय?

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांनी आज शासकीय विश्रामगृहात बंद खोलीत चर्चा केली. या विषयी खासदार उदयनराजेंकडून जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. रामराजेंसोबतचा तुमचा संघर्ष पाहिला आहे. आज ते तुमच्या भेटीला आले होते. नेमकी काय चर्चा झालीय.

यावर उदयनराजे म्हणाले, माझा कोणी शत्रू नाही. मी त्या बरोबरीचा कोणाला समजतच नाही. आमच्यात वैचारिक मतभेद असणारच आहेत. माझी बांधिलकी तत्वाशी आहे. तत्वाला धरून विचार मांडले होते. त्यांच्याशी माझे शत्रुत्व असण्याचे कारण नाही. जिल्हा बँक बिनविरोध होईल, असे वाटते का? माझ्या वाटण्या न वाटण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येकाच्या वाटणीला काय येतंय त्याच्यावर ते ठरणार आहे. माझ्या वाटण्याचा प्रश्न नाही, उदयनराजे कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो!

उदयनराजेंचे मोठे वलय आहे, शब्द आहे, यावर ते म्हणाले, जे लोक हे सर्व पहात असतील ते सर्व पोट धरून हसत असतील. मी या भानगडीत पडत नाही. काम करत राहणे लोकांची सेवा करणे, हे माझे काम आहे. तुम्ही सध्या खूपच सक्रिय झाला आहात, या प्रश्नावर ते म्हणाले, मी नेहमीच सक्रिय होतो. ज्यांना दिसलो नाही ते त्यावेळी सक्रिय नव्हते. त्यांच्या डोळ्यावर काही पडदा बांधलेला असावा, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.

loading image
go to top