रामराजे सातारा जिल्ह्याला लागलेला 'कॅन्सर'; विजयानंतर शेखर गोरेंची जळजळीत टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shekhar Gore

माणमध्ये राष्ट्रवादी व भाजपने अभद्र युती केली होती.

रामराजे सातारा जिल्ह्याला लागलेला 'कॅन्सर' : शेखर गोरे

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : माणमध्ये राष्ट्रवादी व भाजपने अभद्र युती केली होती. रामराजे हा सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर आहे, अशी जळजळीत टीका सातारा जिल्हा बॅंकेचे विजयी उमेदवार शेखर गोरे (Shivsena leader Shekhar Gore) यांनी केली.

सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेल्या माण सोसायटी मतदारसंघाची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. ७४ पैकी झालेल्या ७२ मतांपैकी शेखर गोरे व मनोज पोळ यांना प्रत्येकी ३६ मते मिळाली. ईश्वर चिठ्ठीचा कौल शेखर गोरे यांना मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले. त्यानंतर काढलेल्या विजयी मिरवणुकीवेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील विधान केले.

हेही वाचा: राष्ट्रवादीला 'चिठ्ठी'चा दणका; शिवसेनेचे शेखर गोरे विजयी

शेखर गोरे म्हणाले, या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपची अभद्र युती झाली. परंतु, त्यांची मते फुटली, यात राष्ट्रवादीची जास्त मते फुटली. रामराजे नाईक-निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर असून तो जोपर्यंत बरा होत नाही, तोपर्यंत माणमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आमदार होवू शकत नाही.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

loading image
go to top