आर्किटेक्टला मारहाण; सात जणांना अटक | Beating | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

आर्किटेक्टला मारहाण; सात जणांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड - खासगी आर्थिक व्यवहारावरून आर्किटेक्टला झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी आज सात जणांना अटक केली. न्यायालयातून त्यांना जामीनही मंजूर झाला. या प्रकरणात नितीन छाजेड यांना मारहाण झालेली नाही. याउलट त्यांनी व्यवहार मिटावा, यासाठी मध्यस्थी केली होती, असे पोलिसांनी सांगितले. आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव पाटील, मुकुंद पाटील, बाळासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, महेश पाटील, अभिजित भंडलकर व तानाजी सुर्वे अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. आर्किटेक्ट भंडारी यांची खासगी फर्म आहे. त्याद्वारे त्यांचा नामदेव पाटील यांच्याशी वेगवेगळ्या प्रकल्पावर आर्थिक व्यवहार सुरू आहे. २०२० मध्ये तो व्यवहार रद्द करून नयन पाटील यांच्यातर्फे केला जाणार असल्याचे सत्यजित ग्रुपतर्फे भंडारी यांना सांगण्यात आले होते.

हेही वाचा: सातारा : कचरामुक्तीत सातारा नगरपालिकेचा डंका

मात्र, भंडारी यांनी सत्यजित ग्रुपला पैसे देणे आहे, अशी नोटीस पाठवली. सत्यजित ग्रुपने ती नोटीस स्वीकारली नाही. त्यामुळे त्यांच्यात आर्थिक वाद होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी सत्यजित पतसंस्थेच्या कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीत वाद झाल्याने जितेंद्र भंडारी यांना पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. त्या वेळी नितीन छाजेड यांनी त्यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न केला, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. मारहाणीत जितेंद्र भंडारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

loading image
go to top