Sharad Ponkshe : 'बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता'

इतिहासात बाजीराव पेशवे (Bajirao Peshwa) यांची ओळख केवळ मस्तानीशी नाते जोडून केली गेली.
Sangli Ganeshotsav Shivaji Maharaj Sharad Ponkshe
Sangli Ganeshotsav Shivaji Maharaj Sharad Ponksheesakal
Summary

शिवछत्रपतींच्या गादीचे सेवक म्हणूनच पेशव्यांनी पंतप्रधानपद तब्बल १०६ वर्षे सांभाळले.

सांगली : बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता. धर्मकारण, राजकारण, युध्दनीती यासह त्यांचा व्यासंग सर्वव्यापी होता. दुर्दैवाने जाती-पातीचे राजकारण व व्यक्तिद्वेषामुळे त्याचा पराक्रम समोर येऊ दिला नाही, असं स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी व्यक्त केलं.

इतिहासात बाजीराव पेशवे (Bajirao Peshwa) यांची ओळख केवळ मस्तानीशी नाते जोडून केली गेली. महापुरुषांचा खरा इतिहास समाजासमोर येण्यासाठी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन त्याचे कर्तृत्व नव्या पिढीने जाणून घ्यावे, असे प्रतिपादनही ज्येष्ठ अभिनेते पोंक्षे यांनी केले.

Sangli Ganeshotsav Shivaji Maharaj Sharad Ponkshe
गद्दारी केलेल्या एकनाथ शिंदेंनी वरळी किंवा ठाण्यातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी; आदित्य ठाकरेंचं ओपन चॅलेंज

'बाजीराव पेशवे यांनी आदर्शवत राज्य केले'

श्री गणपती पंचायतन संस्थानतर्फे दरबार हॉलमध्ये आयोजित श्री गणपती उत्सवातंर्गत दुसरे पुष्प त्यांनी ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ या विषयावर गुंफले. पोंक्षे म्हणाले, शिवछत्रपतींचे साम्राज्य अखंड राहण्यासाठी बाजीराव पेशवे यांनी आदर्शवत राज्य केले. अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी पेशवेपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर शेवटपर्यंत ते अपराजित राहिले. पंचमहाभुतांचा पुरेपूर अभ्यास करुन त्यानी युध्दनिती आखली. त्यामुळे ते यशस्वी झाले.

Sangli Ganeshotsav Shivaji Maharaj Sharad Ponkshe
Kolhapur : निवडणुकीपूर्वीच उडणार धुरळा! 'या' मतदारसंघात माने, शेट्टींसह खोतांचीही 'एन्ट्री'; दिग्गज नेत्यांत 'काँटे की टक्कर'

'पेशव्यांचा पराभव म्हणजे छत्रपतींचा पराभव होता'

बाजीराव पेशवे यांचा पराक्रम अद्भुत असाच आहे. जात-पात न मानता, वंशपरंपरेला महत्व न देता केवळ कर्तृत्‍वाला त्यांनी प्राधान्य दिल्याने ते लोकप्रिय झाले. भारतवर्षाला लुटू पाहणाऱ्यांना त्यांनी मात दिली. अल्पायुषी ठरुनही ४१ लढायात ते यशस्वी झाले. शिवछत्रपतींच्या गादीचे सेवक म्हणूनच पेशव्यांनी पंतप्रधानपद तब्बल १०६ वर्षे सांभाळले. पेशव्यांचा पराभव म्हणजे छत्रपतींचा पराभव होता. मराठा साम्राज्याची हानी मराठी मुलुखातील फंदफितुरीने झाली, असेही त्यांनी सांगितले.

Sangli Ganeshotsav Shivaji Maharaj Sharad Ponkshe
Sadabhau Khot : 'दीड वर्ष आम्ही मशागत केली आणि वीस दिवसांत धैर्यशील माने खासदार झाले, आता त्यांनी पैरा फेडावा'

'जातीचा रोग संपल्याशिवाय त्यांची खरी कामगिरी कळणार नाही'

अभिनेते पोंक्षे म्हणाले, 'केवळ जातीव्देष म्हणून त्यांची समाधीही सुस्थितीत न ठेवण्याचे काम सुरु आहे. त्यांच्यावर जास्त साहित्यही उपलब्ध नाही. त्यांचा इतिहासच नसल्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मागमूस नाही. जातीचा रोग संपल्याशिवाय त्यांची खरी कामगिरी कळणार नाही. महापुरुषांना सेक्युलर ठरवून त्यांना जातीत बंदिस्त केले जाण्याचे हिडीस प्रकार सुरु आहेत.' संस्थानचे अधिपती विजयसिंहराजे पटवर्धन, राजलक्ष्मीराजे पटवर्धन, पोर्णिमाराजे, संस्थानचे मॅनेजर जयदीप अभ्यंकर, सिध्दार्थ गाडगीळ, मंजिरी गाडगीळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com