

MLA Ramraje Warns Public Against Fearmongers
Sakal
फलटण : आम्हाला ठरवूनही वाईट वागता येत नाही, कारण आम्ही मालोजीराजे यांच्या संस्कारातून लोकसेवा करत आलो आहे. त्यांना ठरवूनही चांगले वागता येत नाही. हा फरक आहे. आम्हाला ३० वर्षांत काय केले, असे विचारले जाते, मग त्यांनीही सांगावे त्यांनी ३० वर्षांत काय केले? फलटणला दहशत आणि बदनामीचे राजकारण करणाऱ्यांपासून सावध राहा, असे आवाहन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.