
Bharat Patankar
Sakal
सातारा : विश्वास पाटील यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वीकारल्याने ते जातीयवादी व धर्मांध साहित्यिकांच्या कळपात सहभागी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी जातीयवादी वक्तव्य केल्याने जाहीर माफी मागावी व अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत साताऱ्याचे संमेलन हे विशिष्ट प्रवाहाच्या हाती गेल्याने शूद्र-अतिशूद्रांसह ब्राह्मण समाजातील जात व्यवस्थेला थारा न मानणाऱ्यांनी संमेलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केले.