कामगारविषयक तरतुदींचा भारतीय मजदूर संघाने नाेंदविला निषेध

प्रशांत घाडगे
Thursday, 29 October 2020

कामगार कपात, ले ऑफ या संबंधातील कामगार संस्थेची अट पूर्ववत करावी, संघटना नोंदणी 45 दिवसांत करण्याचा कायदा त्वरित करा आदी मागण्यासांठी आंदाेलन करण्यात आले.

सातारा : नवीन कामगार कायद्यातील कामगार हिताविरोधातील तरतुदी तत्काळ रद्द करा, कंत्राटी कामगारांना सेवेत कायस्वरूपी करा यांसह इतर मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत केंद्र सरकारच्या कामगारविषयक तरतुदींचा निषेध करण्यात आला.

यावेळी कामगारांनी केंद्र सरकाराच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामगारांनी दिलेल्या घाेषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला. याप्रसंगी शामराव गोळे, सुरेंद्र बोरकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

लुटीचा आरोप करत कांदा उत्पादक ‘नाफेड’च्या विरोधात आक्रमक! दबावतंत्राच्या विरोधात शरद पवारांकडे तक्रार 
 
कामगार कपात, ले ऑफ या संबंधातील कामगार संस्थेची अट पूर्ववत करावी, संघटना नोंदणी 45 दिवसांत करण्याचा कायदा त्वरित करा, कामगार न्यायालयातील प्रशासकीय हस्तक्षेप कमी करा, सर्व केंद्रीय संघटनांशी चर्चा करून प्रस्तावित कायद्यात बदल करा, आंतराष्ट्रीय कामगार संघटनांच्या कन्व्हेशन 144 चा भंग करण्याच्या तरतुदी रद्द कराव्यात, या मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhartiya Majdoor Sangh Agitation Near Powai Naka Satara News