
खंडाळा तालुका बहुजन हक्क समितीमार्फत 9 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पारगाव-खंडाळा एसटी स्टॅंड ते खंडाळा तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
शिरवळ (जि.सातारा) ः संविधानाने दिलेली आरक्षणे अबाधित ठेऊनच इतर समाजातील आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला, तरच सामाजिक समतोल राखला जाईल. बहुजनांनी आरक्षण टिकवण्यासाठी एकत्र यावे. नऊ डिसेंबरच्या मोर्चास सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी केले.
शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे बहुजन हक्क समिती व इतर समाज संघटनांनी आयोजिलेल्या बहुजन आरक्षण बचाव संवाद बैठकीत ते बोलत होते. या वेळी सर्व राजकीय पक्षातील बहुजन समाजातील नेते व्यासपीठावर एकत्र आले होते.
पुस्तक दानातून वाचनसंस्कृतीला बळ : प्रदीप विधाते
श्री. भुजबळ म्हणाले, ""संविधानाने बहुजनांना दिलेले आरक्षण आजही कायद्याने कायम आहेत. सध्या विविध क्षेत्रांतील आरक्षणासाठी अनेक घटकांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आपले आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बहुजन समाजातील सर्व अठरापगड जातीतील लोकांचे हक्क अबाधित राहावेत व त्यांच्या सवलती कायम राहाव्यात, यासाठी 9 डिसेंबरच्या मोर्चाच्या नियोजन खंडाळा तालुक्यात अतिशय कौशल्य पूर्ण केले आहे.''
याप्रसंगी राजेंद्र नेवसे, रामदास काबंळे, प्रदीप माने, संदीप नेवसे, नामदेव लोहार व प्रदीप क्षीरसागर यांचीही भाषणे झाली. दरम्यान, खंडाळा तालुका बहुजन हक्क समितीमार्फत 9 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पारगाव-खंडाळा एसटी स्टॅंड ते खंडाळा तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
विनोबांच्या आचार्य कुलातील सज्जन शक्तीची देशाला गरज
Edited By : Siddharth Latkar