

Dilipsingh Bhosale alleges conspiracy by opponents; says a mastermind is behind Sushma Andhare and Agawane’s actions.
Sakal
फलटण: येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांनी केलेले आरोप निराधार असून, त्यांच्या पाठीमागे कोणीतरी मास्टरमाइंड आहे. आम्हाला या प्रकरणात गोवण्याचे विरोधकांचे षडयंत्र असल्याचे हॉटेल मधुदीपचे संचालक दिलीपसिंह भोसले सांगितले. पुण्यात अंधारे व आगवणे यांनी केलेल्या आरोपला आज श्री. भोसले यांनी फलटणमध्ये पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. या वेळी तेजसिंह भोसले, रणजितसिंह भोसले उपस्थित होते.