
दहिवडी : रिमझिम पावसात आरोळ्या, शौकिनांचा जल्लोष, घुमक व हलगीचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी अशा वातावरणात बिदाल (ता. माण) येथे बैलांची तोरण मारण्याची स्पर्धा रंगली. या स्पर्धेला शौकिनांचा मोठा प्रतिसाद लाभला. माण, खटाव, फलटण, कोरेगावसह विविध ठिकाणांहून आलेल्या ८४ बैलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.