

BJP workers rejoice after Asha Pandit is declared elected unopposed in the Satara Municipal Council.
Sakal
सातारा: निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर अंतिम यादी जाहीर करण्यात प्रशासकीय यंत्रणेने जिल्ह्यातील सर्व पालिकांच्या यंत्रणापेक्षा जास्त वेळ घेतला आहे. त्यामुळे अर्ज दाखल केलेल्यांची अंतिम यादी आज दुपारपर्यंत जाहीर करणे प्रशासनाला शक्य झाले नव्हते. आज सायंकाळी उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्वांची नावे समोर आली. त्यानुसार प्रभाग क्रमांक २० मध्ये ओबीसी महिला प्रवर्गातून भाजपच्या आशा पंडित यांचा एकमेव अर्ज असल्याचे समोर आले. त्यामुळे छाननीमध्ये अर्ज वैध ठरल्यास त्यांची बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.