Praniti Shinde : देशात लोकांची हुकूमशाही, पंतप्रधानांची नाही; प्रणिती शिंदेंची PM मोदींवर जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) विरोधक सातत्यानं टीका करत आहेत.
Narendra Modi vs Praniti Shinde
Narendra Modi vs Praniti Shindeesakal
Summary

आपलं नातं हे आमदार आणि मतदाराचा नसून आई आणि मुलीचं आहे. आम्ही जर नाही आलो तर कान धरून खाली बसवा तो तुमचा अधिकार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) विरोधक सातत्यानं टीका करत आहेत. आता काँग्रेस (Congress) आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी देखील पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

देशात लोकांची हुकूमशाही आहे म्हणजेच लोकशाही आहे. कोणत्या पंतप्रधानाची हुकूमशाही नाहीये, असं म्हणत आमदार प्रणिती शिंदेंनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला.

Narendra Modi vs Praniti Shinde
Satara : छत्रपतींबद्दल आदर असता तर संभाजीराजेंना का तिकीट दिलं नाही? शिवेंद्रराजेंचा ठाकरेंना सवाल

सोलापुरात (Solapur) हाथ से हाथ जोडो (Hath Se Hath Jodo) अभियानादरम्यान शिंदेंनी सोलापूरकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोदींनाही धारेवर धरलं. आमदार शिंदे म्हणाल्या, निवडणुका असू देत अथवा नसू देत काँग्रेस आणि मी सदैव तुमच्या सेवेत आहोत. कदाचित, निवडणुका दरम्यान आम्ही तुमच्याकडं येणार नाही. मात्र, अडीअडचणीत तुमच्या सुखा-दुख:त मी सदैव तुमच्यासाठी धावून येईन, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Narendra Modi vs Praniti Shinde
Mamata Banerjee : तुम्हाला मी आवडत नसेल, तर माझं मुंडकं कापून टाका; असं का म्हणाल्या ममता बॅनर्जी?

शिंदे पुढं म्हणाल्या, आपलं नातं हे आमदार आणि मतदाराचा नसून आई आणि मुलीचं आहे. आम्ही जर नाही आलो तर कान धरून खाली बसवा तो तुमचा अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) दिलेल्या लोकशाहीचा तुमचा अधिकार आहे. देशात लोकांची शाही लोकशाही म्हणजेच लोकांची हुकुमशाही आहे. कोणत्या पंतप्रधानाची हुकूमशाही नाही आहे. आम्ही तुमचे सेवक आहोत, मी आमदार असेल माझ्या घरी, तुमच्यापेक्षा आम्ही मोठे नाही आहोत, असंही शिंदेंनी नमूद केलं. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार प्रहार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com