
बहुतेक लोकांच्या घरात स्वयंपाकातील खाद्यतेल, कांदा, बटाटा महत्त्वाचे व आवश्यक जिन्नस आहेत. त्यांच्या वाढत्या दराने महिलावर्ग चिंतेत आहे. भाजी मंडईत कांदा, बटाट्याबरोबर भाजीपाल्यांचे दरही वाढले आहेत. कांद्याच्या उत्पादन खर्चाशी निगडित कांद्यास हमखास भाव मिळण्यासाठी केंद्र शासनाने निर्यातबंदी उठविण्याची शेतकऱ्यांची आंदोलन, मोर्चाद्वारे मागणी होत आहे.
ओगलेवाडी (जि. सातारा) : बाजारात खाद्यतेलाच्या (सोयाबीन तेल) भावाने विक्रमी उच्चांक केला आहे. खाद्यतेलाच्या दराने शंभरी ओलांडली आहे. एक किलोचा दर 105 ते 110 रुपये झाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे, तसेच कांदा व बटाट्याचे भाव वाढू लागले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत असल्याने सामान्य लोकांचे जगणे अवघड झाले आहे. लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
बहुतेक लोकांच्या घरात स्वयंपाकातील खाद्यतेल, कांदा, बटाटा महत्त्वाचे व आवश्यक जिन्नस आहेत. त्यांच्या वाढत्या दराने महिलावर्ग चिंतेत आहे. भाजी मंडईत कांदा, बटाट्याबरोबर भाजीपाल्यांचे दरही वाढले आहेत. कांद्याच्या उत्पादन खर्चाशी निगडित कांद्यास हमखास भाव मिळण्यासाठी केंद्र शासनाने निर्यातबंदी उठविण्याची शेतकऱ्यांची आंदोलन, मोर्चाद्वारे मागणी होत आहे. कांदा उत्पादन भागात बाजार समितीच्या क्षेत्रात खरेदी-विक्री व्यवहार बंद आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारात त्याची आवक कमी झाल्याने, पावसाने कांद्याचे नुकसान झाल्याने त्याचा परिणाम भावावर झाला आहे.
खाद्यतेलांची आयात मंदावली; पेट्रोल- डिझेलपाठोपाठ ग्राहकांवर नवा भार
कांद्याचा किलोचा भाव 15 वरून 20 ते 30 रुपये झाला आहे, तर बटाट्याचे भाव 30 रुपयांवरून 40 ते 45 रुपये झाल्याने ग्राहकांना महागाईला तोंड द्यावे लागत आहे. गरिबांचे खाणे कांदा-भाकरी, खाद्यतेल आता महाग झाले आहेत. ज्वारी भावही वाढले आहेत. तेलाचे भाव किलोला 160 ते 170 रुपयांपर्यंत वाढले आहे. दरम्यान, नवा कांदा बाजारात येण्यास अद्याप महिना-दीड महिना अवधी आहे. त्यामुळे कांद्याचे भाव तेजीतच राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे