

Farmers working in fields as Maharashtra government announces new land subdivision rules.
sakal
कोरेगाव : एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे पोट हिस्से आता अवघ्या दोनशे रुपयांमध्ये होणार आहेत. राज्य भूमी अभिलेख विभागाने ‘मोजणी फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेत, त्याबाबतचे आदेश काढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचून दिलासा मिळणार आहे, तर भूमी अभिलेख विभागाचे नकाशे व सातबारे अद्ययावत होणार आहेत. लवकरच याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.