
सातारा : राज्यातील काही जिल्ह्यांत बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे, तर सातारा जिल्ह्यात अजूनही शिरकाव झालेला नाही, तरी देखील त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. यासाठी ४६ शीघ्र कृती दल तयार करण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत सातारा जिल्ह्यात सुमारे ४० लाख कुक्कुट पक्षी असून, ते सुरक्षित आहेत.