
लोणंद : खंडाळा तालुक्यातील बोरी व सुखेड येथे आज परंपरेनुसार नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बोरीचा बार भरला. यावेळी बार घालण्यासाठी ओढ्याच्या दोन्ही तीरावर उपस्थित महिलांनी एकमेकींना हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहिली. यावेळी स्थानिक व बाहेरगावाहून आलेल्या महिला व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.