Political News : नगरपंचायतीवर भाजपाची सत्ता येणार'

BJP Government
BJP Governmentesakal
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनानं विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या आहेत.

वडूज (सातारा) : येथील नगरपंचायतीवर (Vaduj Nagar Panchayat) भारतीय जनता पक्षाची (Bharatiya Janata Party) सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. नगरपंचायत निवडणुकीच्या (Nagar Panchayat Election) पार्श्वभूमीवर येथे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व प्रभारी विकल्पशेठ शहा यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. त्यावेळी हा निर्धार करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य नंदकुमार गोडसे, शहराध्यक्ष प्रदीप शेटे, डॉ. वैभव माने, अनिल माळी, जयवंत पाटील, वचनशेठ शहा, डॉ. प्रशांत गोडसे, शशिकांत पाटोळे, श्रीकांत बनसोडे, निलेश कर्पे, संजय काळे, सोमनाथ जाधव, प्रदीप खुडे, बनाजी पाटोळे, जयवंत गोडसे, श्रीकांत काळे, आकाश जाधव, सुयोग शेटे, अमर फडतरे, संतोष शहा, किरण कांबळे आदी उपस्थित होते. प्रभारी शहा म्हणाले, केंद्रात भाजपाचं सरकार (BJP Government) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनानं विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या आहेत, तर आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली खटाव-माण तालुक्यात चौफेर विकास होत आहे.

BJP Government
'10 वर्षात काँग्रेसचा 90 टक्क्यांहून अधिक निवडणुकांत पराभव'

ते पुढे म्हणाले, वडूज शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नगरपंचायत ही भाजपाच्या विचारांची असणं आवश्यक आहे. नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपातून उमेदवारीसाठी अनेकांचा वाढता कल आहे. उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असली, तरी सर्वानुमते उमेदवाराची निवड केली जाईल. शहर परिसरात भाजपाची चांगली ताकद आहे. त्यामुळं शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं भाजपा नगरपंचायतीवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. प्रा. अजय शेटे यांनी स्वागत केलं. यावेळी उमेदवार निवडीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वांनी एकदिलानं काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

BJP Government
पंचायत समितीच्या सभापतिपदी NCP च्या अश्विनी पवारांची बिनविरोध निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com