Karad : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कधीच सहन करणार नाही; मंत्री खर्गेंविरोधात भाजप आक्रमक

मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं आहे.
Karad BJP
Karad BJPesakal
Summary

राहुल गांधी आणि आता खर्गे सावरकरांवर टीका करताहेत. पण, या देशातील जनता स्वातंत्र्यवीरांचा अवमान कधीच सहन करणार नाही.

कऱ्हाड : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे पुत्र, कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कऱ्हाड दक्षिण शाखेच्या वतीने मलकापूर येथे जोरदार निदर्शने करुन निषेध व्यक्त करण्यात आला.

कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचं (Vinayak Damodar Savarkar) योगदान काय? आणि त्यांचा पराक्रम काय? असा प्रश्न उपस्थित करुन देशातील संपूर्ण देशभक्तांचा अपमान केला आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

Karad BJP
Koyna Dam : कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यात अडचण नाही, पण..; मंत्री देसाईंनी आमदार गाडगीळांना सांगितलं 'हे' कारण

राहुल गांधी आणि आता खर्गे सावरकरांवर टीका करताहेत. पण, या देशातील जनता स्वातंत्र्यवीरांचा अवमान कधीच सहन करणार नाही. या अवमानाबद्दल मतदारही काँग्रेसला धडा शिकवतील, असा इशारा यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिला.

Karad BJP
Loksabha Election : 'रायगड लोकसभेची जागा मीच लढवणार'; अजितदादांच्या 'त्या' घोषणेनंतर तटकरेही ठाम

यावेळी खर्गे आणि काँग्रेसच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी सरपंच मोहनराव जाधव, पंकज पाटील, धनाजी माने, नंदकुमार जाधव, बाळासो पवार, प्रदीप जाधव, संजय पाटील, अरुण जाधव, संजय सावंत, जयकर मोरे, विक्रम जाधव, शिवराज जाधव, महादेव कुंभार, शिवराज जाधव, संभाजी ढापरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com