दार उघड उद्धवा, दार उघड ! कऱ्हाड, पाटण, येराड, फलटणला दुमदुमला भाजपचा घंटानाद

सचिन शिंदे
Sunday, 30 August 2020

धार्मिकस्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

कऱ्हाड ः मंदिरे उघडण्यासाठी आघाडी सरकारने परवानगी द्यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कऱ्हाड तालुक्‍यात घंटानाद आंदोलन करण्यात आले. पक्षाचे पदाधिकारी त्यामध्ये सहभागी झाले होते. या वेळी घोषणाबाजीही करण्यात आली.
सातारा जिल्हा बॅंकेत युपीआय सेवा

येथील दत्त चौकातील दत्त मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. सहकार परिषदेचे राज्य संयोजक शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. नगरसेवक सुहास जगताप, भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन वासके, भटक्‍या आघाडीचे जिल्हाध्यक्ष रुपेश मुळे, शहर उपाध्यक्ष मुकुंद चरेगावकर, नितीन शाह, सुनील नाकोड, प्रमोद शिंदे, समाधान चव्हाण, विश्वनाथ फुटाणे व कार्यकर्ते उपस्थित होते.

वाईत महागणपती घाटावर घंटानाद; महाबळेश्वर, पाचगणीत भजन आंदोलन  

पाटण, येराडलाही आंदोलन 

मोरगिरी : मंदिरे सुरू करण्यासाठी पाटण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने देऊळ उघडा आंदोलन करण्यात आले. भाजपचे तालुकाध्यक्ष सागर माने यांच्या नेतृत्वाखाली पाटण येथील विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर, येराडच्या येडोबा मंदिरासमोर आंदोलन झाले. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात आला. मंदिरे उघडली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा माने यांनी दिला.

विश्वास बसेल का? 'रोहित पवार'ने चोरला टीव्ही

आंदोलनात यश पावसकर, अमरसिंह पाटील, राजेंद्र माने, रंजित भाटी, सागर सरगडे, अमोल पावसकर, संदीप चव्हाण आदी कार्यकर्ते सभागी झाले. अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. आण्णासाहेब शिंदे, मानद अध्यक्ष शिवाजी साखरे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. 

आमच्यात भेदभाव कशासाठी?, सैनिकांचा सरकारला सवाल

श्री नाईकबा मंदिरासमोर घंटानाद
 
ढेबेवाडी : संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र नाईकबा मंदिर दर्शनासाठी खुले करावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंदिर परिसरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाडिक, गणेश यादव, सुरेखा तुपे आदींसह कार्यकर्ते, स्थानिक व्यावसायिक, नागरिक उपस्थित होते. महाडिक म्हणाले, ""शासन दारूसह विविध प्रकारची दुकाने, हॉटेल्स उघडायला परवानगी देतेय मग मंदिरांनाच अडथळा कशासाठी? काही महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे.''

देवेंद्र फडणवीस यांनी साता-यात ठाकरे सरकारला विचारला जाब; म्हणाले, तुम्हाला हे बरं चालतं!

फलटण येथे घंटानाद आंदोलन 

फलटण शहर : धार्मिकस्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे घंटानाद आंदोलन येथे करण्यात आले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरामध्ये जैन मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, श्रीराम मंदिर, चॉंदतारा मशिदसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

शिवपुतळ्यावरुन फडणवीसांचा मुश्रीफांवर हल्लाबोल

या आंदोलानात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, सरचिटणीस मुक्ती शहा, शहराध्यक्ष अमोल सस्ते, गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक अनुप शहा, सचिन अहिवळे, अमरसिंह नाईक निंबाळकर, बजरंग गावडे, उदय मांढरे, माणिक शहा, संजय चिटणीस, जाकिर मणेर, रियाज इनामदार, उषा राऊत, नीलेश चिंचकर, राजकुमार देशमाने, नितीन जगताप, संदीप जाधव, संदीप साप्ते, राजेश शिंदे, राहुल आव्हाड, दत्तात्रय खेडकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पुण्यातील एकासह साताऱ्यातील वकीलावर गुन्हा; निघाले हाेते महाबळेश्वरच विकायला

संपादन : सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Agitation In Karad Phaltan Patan To Reopen Temples From Maharashtra