मसूर-कऱ्हाड बससाठी भाजपचा आक्रमक पवित्रा!

मसूर-कऱ्हाड बससाठी भाजपचा आक्रमक पवित्रा!

मसूर (जि. सातारा) : मसूर-कऱ्हाड बससेवा लवकर सुरू करण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षातर्फे कऱ्हाड आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. या भागातून रोज व्यवसाय, नोकरीनिमित्ताने लोक कऱ्हाडला जातात. मात्र, कऱ्हाड ते मसूर बससेवा बंद असल्याने प्रवाशांना ये-जा करता येत नाही. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मसूर भागात बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र, सध्या सरकारने लाॅकडाउन शिथील केला आहे, त्यामुळे या भागात पुन्हा बस पूर्ववत करावी, जेणे करुन येथील नागरिकांना प्रवास करता येईल. या भागात बसची ये-जा नसल्याने अनेकांना लांबच्या पल्यासाठी पायपीट करावी लागत आहे. 

मसूर भागातील प्रवाशांची समस्या भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा सचिव दीपाली खोत, सैदापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी कऱ्हाडच्या आगार प्रमुखांकडे मांडली आहे. यावेळी कऱ्हाड उत्तर उपाध्यक्षा नम्रता कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष भारती पवार, नीलम उदुगडे, संचिता रविढोणे, रूपाली थोरात, तेजस्वी चव्हाण, सुचिता वेल्हाळ, शुभांगी जगदाळे, प्रणव कांबळे, धनराज घोरपडे उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com