
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी एक दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्ह्यातून १६ जणांची नावे चर्चेमध्ये आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक सुनील काटकर यांच्यात चुरस आहे. यावेळेस नऊ जिल्हाध्यक्षपदावर महिलांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे साताऱ्यातून चित्रलेखा माने-कदम, सुवर्णा पाटील, कविता कचरे यांच्यापैकी एकीच्या नावाचाही विचार होऊ शकतो. त्यामुळे या निवडीत खासदार उदयनराजे भोसले की मंत्री जयकुमार गोरे यांच्या गटाला भाजपकडून बळ मिळणार याची उत्सुकता आहे.