

Manohar Shinde joins BJP, calls it a tough decision; demands government funds for pending development works in Malkapur city.
Sakal
मलकापूर : भाजपमध्ये प्रवेश करणे हा निर्णय माझ्यासाठी कठीण आहे. मात्र, २४ वर्षांच्या वाटचालीमध्ये माझ्यासोबत असणाऱ्या समर्थकांना मी न्याय देऊ शकलो नाही, तर काळ मला माफ करणार नाही, अशी माझी भावना झाली, तसेच शहरातील प्रलंबित विकासकामांसाठी त्वरित ५१ कोटींच्या निधीची गरज आहे. तो निधी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो. त्यामुळे मलकापूरच्या विकासाचा विचार करून जनतेच्या हितासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.