Sangli Satara Election: राजांचे शिलेदार मुळशीत; कऱ्हाडचे गोव्‍यात; सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक, भाजपकडून मतांसाठी जुळवाजुळव

Political camps in Mulshi and Goa ahead of MLC polls: सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपकडून नगरसेवकांना मुळशी-गोवा पर्यटनाच्या नावाखाली मुक्कामी ठेवत मतांची जुळवाजुळव, ‘राजांचे शिलेदार’ एकदिलाने कमळ फुलवण्याच्या तयारीत
Political Strategy in Full Swing Ahead of Council Polls; BJP Focuses on Securing Votes

Political Strategy in Full Swing Ahead of Council Polls; BJP Focuses on Securing Votes

sakal

Updated on: 

सातारा : पालिकेत एरवी एकमेकांची जिरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या सदस्‍यांनी आज मात्र एकजुटीने ‘ओनली एन्जॉय’ असा सूर आळवत सातारा सोडला. प्रवासात गाण्यांच्या भेंड्या, इकडच्या तिकडच्या गप्पा मारत कधी मुळशी आले हे कळलेच नाही. दिवसभराच्या थकव्यानंतर बॉईज टीमने क्रिकेटचे मैदान पकडले, तर महिलांनी पदर खोचत खो- खो खेळण्याचा आनंद लुटला. येत्या गुरुवारपर्यंत (ता. १८) असेच एक दिलाने राहून राजांचे शिलेदार आम्ही...भाजपचे कमळ फुलवायचे आहे, अशा प्रतिक्रिया काही नगरसेवकांनी आज दिल्‍या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com