निष्क्रिय महाविकासला मतदार जागा दाखवतील : मदन भाेसले

निष्क्रिय महाविकासला मतदार जागा दाखवतील : मदन भाेसले

भुईंज (जि. सातारा) : भाजप सत्तेत असता तर पदवीधर मतदारसंघाचे काम फार सोपे झाले असते. तरीही पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून संग्रामसिंह देशमुख व शिक्षक मतदारसंघाचे जितेंद्र पवार यांना वाई विधानसभा मतदारसंघातून मताधिक्‍य देऊन विजयी करू, असे आश्‍वासन किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिले.

भुईंज येथे वाई तालुक्‍यातील पदवीधर मतदारांसाठी संवाद बैठक झाली. त्याप्रंसगी ते बोलत होते. श्री. भोसले म्हणाले,""मतदारांना मतदान प्रक्रिया योग्य समजावून द्यावी. निष्क्रिय सरकारच्या एक वर्षाच्या कालावधीनंतरची ही निवडणूक होत आहे. मतदानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला योग्य संदेश द्यावा.'' वाई विधानसभा मतदारसंघातील सुमारे 3,143 मतदारांपैकी जास्तीत जास्त मतदानही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सतीश देशमुख म्हणाले, ""संग्रामसिंह देशमुख हे पदवीधरांसाठी भरपूर काम करण्यास समर्थ आहेत, त्यांना आपल्या मतदारसंघातून मताधिक्‍य देऊन विजयी करा.'' यावेळी सतीश संपतराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस सचिन घाडगे, सतीश भोसले, भैय्यासाहेब जाधवराव, प्रवीण जगताप, मधुकर शिंदे, वाई तालुका भाजप अध्यक्ष रोहिदास पिसाळ, शंकर लेले, सचिन घाडगे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, युवा मोर्चाचे सरचिटणीस यशराज भोसले, इशान भोसले, माजी सरंपच बाळासाहेब कांबळे, उपसंरपच प्रशांत जाधवराव आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीची राज्यात दडपशाही : रणजितसिंह मोहिते-पाटील

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com