esakal | निष्ठावंतावरील अन्याय खडसेंना कधीच दिसला नाही : प्रवीण दरेकर
sakal

बोलून बातमी शोधा

निष्ठावंतावरील अन्याय खडसेंना कधीच दिसला नाही : प्रवीण दरेकर

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे वचन पाळणारे आहेत. त्यांनी शेतकरी यांच्या बांधावर जावुन हेक्टरी 25 हजार रूपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता आता त्यांनी करावी माजी मुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी यांना हेक्टरी 18 हजार रूपये देण्याचा अध्यादेश काढला होता. त्या प्रमाणे आघाडी सरकारने शेतकरी यांना तात्काळ नुकसान भरपाई म्हणुन दहा ते पंधरा हजार रूपये दयावे अशी मागणीही दरेकर यांनी या वेळी केली.

निष्ठावंतावरील अन्याय खडसेंना कधीच दिसला नाही : प्रवीण दरेकर

sakal_logo
By
अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर : एकनाथ खडसे यांच्या खांदयावर बंदुक ठेवुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले जात आहे असा आरोप करून विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाला येथे शुभेच्छा दिल्या. 

परतीच्या वादळी पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून तेथील शेतकरी यांना दिलासा देण्यासाठी आमदार प्रविण दरेकर हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. हा दौरा आटपुन कोकण दौ-यावर जाण्यापुर्वी महाबळेश्वर येथे थांबले होते. हिरडा विश्रामगृहावर  गुरुवारी झालेल्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

राजेंच्या भेटीपूर्वी खडसेंच्या प्रवेशावर दरेकरांनी राष्ट्रवादीला 'खडसावले'

भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करून आज (शुक्रवार) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केेले परंतु त्यांनी भाजपा सोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस कारण असल्याचा आरोप करून त्यांनी फडणवीस यांचेवर राेख धरला आहे. या आरोपाचे खंडण आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. ते म्हणाले राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये खासदार शरद पवार निर्णय घेतात, शिवसेनेत ठाकरे तर कॉंग्रेसचे निर्णय हे गांधी घेतात तसे भाजपामध्ये नाही. भाजपात सामुदायिक नेतृत्व आहे. त्यामुळे एका व्यक्तीवर आरोप करणे चुकीचे आहे. फडणवीस यांनी आपल्यावर पक्षात राहुन खुप अन्याय केल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. या अरोपाचा समाचार घेताना देरेकर म्हणाले अन्यायाची भाषा खडसे यांच्या तोंडी शोभत नाही. खडसे यांनी पक्षासाठी काम केले पक्ष मोठा केला यामध्ये दुमत नाही परंतु त्या पेक्षा कितीतरी पटीने पक्षाने खडसे यांना परत केले आहे. त्यांच्या घरातील प्रत्येकाला पदे दिली. पन्नास पेक्षा अधिक पदे खडसे यांच्या घरातील लोकांकडेच आहेत. यावेळी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर जो अन्याय झाला तो खडसे यांना दिसला नाही का असा सवाल करून खडसे यांनी अन्यायाची भाषा करू नये असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

उदयनराजेंचे सूचक विधान लवकरच चांगले घडेल, फडणवीस आणि दरेकर राज्य ताब्यात घेतील

पक्ष सोडताना त्या पक्षातील कोणाला तरी खलनायक बनवायचा असतो अशी प्रथा आहे. त्यानुसार खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खलनायक ठरविले आहे. देवेंद्र हे खुप पारदर्शक काम करीत असल्याने त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी यश येत नाही म्हणुन हताश झालेल्या लोकांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेश या घटनेच्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोपही दरेकर यांनी पत्रकारांशी बोलाताना केला.
 
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी यांना दिलासा देण्यासाठी गेली तीन दिवसां पासुन मी सोलापुर, सांगली, सातारा जिल्हयाच्या दौ-यावर आलो आहे. शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळाली पाहीजे यासाठी मी बांधावर जावुन शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी यांना दिलासा देण्याचे काम करीत आहे. या भागातील शेतकरी यांच्या कडे शेतीचे क्षेत्र अत्यंत कमी आहे. त्या मुळे सेवा सोसायटया शेतकरी यांना सभासद करून घेत नाहीत. सभासद केले तर त्यांना कर्ज देत नाहीत. कर्ज पुरवठा करताना सोसायटया या पक्षपात व भेदभाव करीत आहेत. या भागातील सेवा सोसायटया हा राजकीय अड्डा बनला आहे. शेतकरी यांची पिळवणुक करणारे सोसायटयांची चौकशी करण्याची मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचेही देरकर यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी सरकारवर दबाव आणू; दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे वचन पाळणारे आहेत. त्यांनी शेतकरी यांच्या बांधावर जावुन हेक्टरी 25 हजार रूपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता आता त्यांनी करावी माजी मुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी यांना हेक्टरी 18 हजार रूपये देण्याचा अध्यादेश काढला होता. त्या प्रमाणे आघाडी सरकारने शेतकरी यांना तात्काळ नुकसान भरपाई म्हणुन दहा ते पंधरा हजार रूपये दयावे अशी मागणीही दरेकर यांनी या वेळी केली.

ठाकरे सरकार निश्‍चित परभणीतला शब्द पाळतील : प्रवीण दरेकर

Edited By : Siddharth Latkar