Pusesawali Riots : पुसेसावळीत दंगल कोणी घडवली, खरे मास्टरमाईंड कोण? 'या' सहा जणांची नाव घेत पावसकरांचा मोठा गौप्यस्फोट

काहीही संबंध नसताना पुसेसावळीतील दंगलीशी विक्रम पावसकरांचा (Vikram Pavaskar) संबंध जोडला जात आहे.
Pusesawali Riots Hindu vs Muslim
Pusesawali Riots Hindu vs Muslimesakal
Summary

वातावरण गढूळ करणाऱ्या लोकांना अटक झाली पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे.

कऱ्हाड : पुसेसावळीतून (Pusesawali Riots) इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकणाऱ्या संशयितांना हजर करणारे व त्यांना पाठीशी घालणारे कऱ्हाडचे अल्ताफ शिकलगार, साबीर मुल्ला, साताऱ्यातील सादिक शेख, रमजान कागदी, जमीर शेख व पुसेसावळीतील बागवान यांना सर्व प्रथम अटक झाली पाहिजे, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Organization) केलीये.

ही वस्तुस्थिती डावलून काहीही संबंध नसताना पुसेसावळीतील दंगलीशी विक्रम पावसकरांचा (Vikram Pavaskar) संबंध जोडला जात आहे. तोही त्वरित थांबवावा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला, तर हिंदुत्ववादी संघटना त्याला प्रतिमोर्चाने उत्तर देतील, असा इशाराही हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषदेत दिला.

Pusesawali Riots Hindu vs Muslim
Pusesawali Riots : पुसेसावळी दंगलीनंतर शिवेंद्रराजेंनी सातारकरांना केलं 'हे' आवाहन; म्हणाले, कठीण प्रसंगात डगमगून..

ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, चंद्रकांत जिरंगे, सागर आमले, राहुल यादव, काकासाहेब जाधव, रूपेश मुळे, अजय पावसकर यांच्यासह बहुसंख्य हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. श्री. पावसकर म्हणाले, ‘‘जमावबंदीचा आदेश लागू असताना अल्पसंख्याक समाजाचे लोक जमाव कसा गोळा करू शकतात हा आमचा प्रश्न आहे. तेव्हा प्रशासन काय करत होते, याचा खुलासा त्यांनी करावा. हिंदूंनी १५ ऑगस्टला मोर्चा काढला. त्यानंतर पंधराव्या दिवशी पोस्ट टाकणाऱ्यांना जामीन झाला. त्या सगळ्याचा उद्रेक होण्याची वेळ येऊ का दिली.

त्याच त्या मुलाने पुन्हा तेच धाडस कसे काय केले. याची चौकशी झाली पाहिजे. त्या सर्वांमागे सहा व्यक्तींचा संबंध आहे. अल्ताफ शिकलगार, सादिक शेख, रमजान कागदी, जमीर शेख, सादिक मुल्ला, बागवान हे लोक घातक आहेत. त्या अनुषंगाने चौकशी करण्याची प्रशासनाला मागणी आहे. त्यांना सातत्याने सोशल माध्यमांवरील पोस्टबाबत माहिती असते. त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे या वातावरण गढूळ करणाऱ्या लोकांना अटक झाली पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे.’’

Pusesawali Riots Hindu vs Muslim
Pusesawali Riots : उसळलेल्‍या दंगलीनंतर तीन दिवसांनी पुसेसावळीतील बंद मागे; आजपासून बाजारपेठ सुरू, पोलिसांचा चोख बंदोबस्त

जिरंगे म्हणाले, ‘‘कोणताही हिंदू पहिली सुरुवात करत नाही. मात्र, सुरुवात ज्यांच्याकडून होते. त्यांच्यावर कारवाई होत नाही. याउलट सकल हिंदू समाजासाठी कार्य करणाऱ्या विक्रम पावसकर यासारख्या नेत्यांवर नाहक आरोप केले जातात. त्यांना अटक करण्याची मागणी केली जाते. त्यासाठी मोर्चाचा घाट घातला जातो. ही सगळी परिस्थिती घातक आहे.

Pusesawali Riots Hindu vs Muslim
Pusesawali Riots : साताऱ्यातील पुसेसावळीत मोठी दंगल; तीन दिवसांपासून बंद असलेली Internet सेवा रात्री उशिरा सुरू

त्यामुळे त्यांनी मोर्चा काढला, तर त्याला प्रतिमोर्चाने उत्तर द्यायची तयारी केली आहे. वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांमध्ये अल्पसंख्याकच का आहेत. पुसेसावळीत काही युवकांनी अलमगीर औरंगजेब असा व्हॉट्सअप ग्रुप काढला होता. तो काय देशभक्तीचे प्रतीक होते का. त्या ग्रुपची चौकशी झाली पाहिजे. तेही टाळले जात आहे.’’ या वेळी राहुल यादव, काकासाहेब जाधव व रूपेश मुळे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

Pusesawali Riots Hindu vs Muslim
पुसेसावळी दंगली प्रकरणात विक्रम पावसकरांना अडकवण्याचं षडयंत्र; हिंदुत्ववादी संघटनांचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com