प्रकरणातील गांभीर्य ओळखा; धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या : भाजप महिला आघाडी

प्रकरणातील गांभीर्य ओळखा; धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या : भाजप महिला आघाडी

सातारा : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले असून, त्याचा समाजमनावर विपरित परिणाम होत आहे. संबंधित महिलेने केलेल्या आरोपांमुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच आंदोलन करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे असणारे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले. यावेळी जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सुवर्णा पाटील, पालिकेच्या बांधकाम सभापती सिध्दी पवार, रिना भणगे, मनीषा पांडे, वैशाली पंडित, नेहा खैर, वैशाली टंकसाळे, स्मिता निकम, वैष्णवी कदम, निर्मला पाटील, दीपिका झाड, नगरसेविका प्राची शहाणे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Breaking News : साता-यात बर्ड फ्लू; मृत कोंबड्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह  

महिलेने केलेल्या अत्याचाराच्या आरोपानंतर मंत्री मुंडे यांनी त्या महिलेशी असलेल्या संबंधांची कबुली दिली होती. अशा बेजबाबदार व्यक्‍तीकडे राज्याच्या जबाबदार मंत्रालयाचा कारभार असणे धोकादायक आहे. या प्रकरणातील गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्‍यक आहे. त्यांचा राजीनामा न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात युवती ठार; मुंढेत शाेककळा

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com