
-हेमंत पवार
कऱ्हाड : राज्यापासून गावपातळीवर फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नसल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसचा या गटात ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा आहे.