Jaykumar Gore : इफ्तार पार्टीला जाताना भाजप आमदाराच्या गाडीला अपघात; कारचं मोठं नुकसान

आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या गाडीला काल (शुक्रवार) रात्री आठच्या सुमारास गोंदवले बुद्रुक येथील चौकात अपघात झाला.
BJP MLA Jaykumar Gore Accident
BJP MLA Jaykumar Gore Accidentesakal

गोंदवले (सातारा) : आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या गाडीला काल (शुक्रवार) रात्री आठच्या सुमारास गोंदवले बुद्रुक येथील चौकात अपघात झाला. अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालंय. या गाडीत आमदार गोरेंचे कार्यकर्ते होते.

BJP MLA Jaykumar Gore Accident
Politics : 'भाजपनं आज तिसरी यादी जाहीर केली नाही तर मी..'; माजी मुख्यमंत्र्यांचा थेट पक्षाला अल्टिमेटम

आमदार गोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह म्हसवड इथं इफ्तार पार्टीसाठी (Iftar Party) निघाले होते. त्यांच्या पाठीमागे असलेल्या दुसऱ्या गाडीतून (एमएच ११ सीझेड १००) कार्यकर्तेही म्हसवडकडे निघाले होते. रात्री आठच्या सुमारास या गाड्यांचा ताफा गोंदवले बुद्रुक येथील मुख्य चौकात आला. त्या वेळी नेहमीप्रमाणे चौकात वाहतूक कोंडी झालेली होती.

BJP MLA Jaykumar Gore Accident
Sachin Pilot : सचिन पायलटांनी काँग्रेस हायकमांडला पकडलं कोंडीत; पक्षाकडं उरला 'हा' शेवटचा पर्याय

या कोंडीतून मार्ग काढून आमदार गोरे पुढे मार्गस्थ झाले; परंतु त्यांच्या गाडीला लागूनच असलेल्या दुसऱ्या गाडीला मात्र, मुंबईकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सनं जोरदार धडक दिली. गर्दीत समोरासमोर आलेल्या वाहनांमुळं रस्ता रिकामा करण्यासाठी ट्रॅव्हल्स मागे घेताना गोरेंच्या गाडीच्या पुढील दारावर जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती, की गोरेंचे वाहन काही फूट ढकलत गेलं. या अपघातात वाहनाचं नुकसान झालं असलं, तरी मोठा अनर्थ मात्र टळला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com