शिवेंद्रसिंहराजेंनी का बरं मानले अजित पवारांचे आभार, वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

या प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रसामग्री इ टेंडरऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांच्याकडील 18 एप्रिलच्या आदेशानुसार पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.
 

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. श्री. पवार यांनी 10 दिवसांतच हा प्रश्न मार्गी लावून जिल्ह्याची मोठी गैरसोय दूर केली आहे. कोरोना चाचणी सेंटरमुळे रुग्णांवरील उपचाराला गती मिळेल, असे मत शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त करून श्री. पवार यांचे आभार मानले.
सातारकरांनो सावध व्हा; कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचे सावट
 
उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर असताना शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती. त्या वेळी सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर सुरू करावे, अशी मागणी केली होती. रुग्णांवर वेळेवर उपचार सुरू होण्यासाठी आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्षम आणि प्रभावीपणे काम करण्यासाठी साताऱ्यातच कोरोना चाचणी सेंटर असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्या वेळीच मंत्री पवार यांनी याबाबत त्वरित निर्णय घेऊ, असा शब्द दिला होता. त्यानंतर दहाच दिवसांत मंत्री पवार यांनी कोरोना चाचणी सेंटरला मंजुरी दिली.
राजमातांचे वकीलपत्र मागे घे, अन्यथा संपवू : दाेघांची धमकी 
 
शासनाने साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा (आरटी पीसीआर लॅब) उभारण्याचा निर्णय मंजूर केला आहे. कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास 75 लाख 46 हजार 186 इतका निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. या प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रसामग्री इ टेंडरऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांच्याकडील 18 एप्रिलच्या आदेशानुसार पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

प्रांताधिकारी म्हणाले, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार निर्णय घेऊ 

लेझीम खेळाचे मानधन गावाच्या मदतीला! दुर्गम धावलीने दाखवला माणुसकीचा मार्ग

Video : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चाखले माेदींचे पेढे 

उदयनराजे पुन्हा मैदानात; राज्य सरकारकडे केली ही मागणी

सातारा जिल्ह्यासाठी महत्त्वाची बातमी; जिल्हाधिकाऱ्यांनी बदलल्या दुकानांच्या वेऴा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Shivendrasinghraje Bhosale Thanked Deputy Chief Minister Ajit Pawar In Satara