

Cross-Voting Concerns Trigger BJP Strategy Ahead of Crucial MLC Election
sakal
सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या मतदारांची विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. क्रॉस वोटिंग आणि फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. मतदानापर्यंत सर्वांना एकत्र ठेवून नाराजांची मनधरणी करण्यासाठी पर्यटनस्थळी नेले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.