esakal | 'एसपींपासून आयजीपर्यंत सर्व पोलिसांना माझे सांगणे आहे, आम्ही टॅक्‍स भरतो म्हणून तुमचे पगार होतात'
sakal

बोलून बातमी शोधा

'एसपींपासून आयजीपर्यंत सर्व पोलिसांना माझे सांगणे आहे, आम्ही टॅक्‍स भरतो म्हणून तुमचे पगार होतात'

पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांची अवस्था काय आहे. पोलिस त्यांनाच अडवतात. एसपींपासून आयजीपर्यंत सर्व पोलिसांना माझे सांगणे आहे, की आम्ही टॅक्‍स भरतो म्हणून तुमचे पगार होतात. तुम्ही शासनाचे नोकर आहात. कधीही लॉकडाउन करायला तुमच्या बापाची इस्टेट आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

'एसपींपासून आयजीपर्यंत सर्व पोलिसांना माझे सांगणे आहे, आम्ही टॅक्‍स भरतो म्हणून तुमचे पगार होतात'

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : कधीही लॉकडाउन (Lockdown) करायला राज्य म्हणजे तुमच्या बापाची इस्टेट आहे का, असा प्रश्न करत लशीचा पुरवठा व्यवस्थित करू शकत नाहीत आणि वर पैसेही खातात, अशी टीका करत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राजेशाही असती तर मी या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडविले असते, असे वक्‍तव्य येथे आंदोलनादरम्यान केले. याच वेळी त्यांनी वाझेकडील (Sachin Vaje) पैसे घ्या आणि लस विकत घेण्याचा सल्लाही राज्य सरकारला दिला.
 
लॉकडाउनच्या निषेधार्थ केलेल्या भीक मांगो आंदोलनावेळी खासदार उदयनराजे म्हणाले, ""अशाप्रकारे आंदोलन करण्याची माझ्यावर वेळ आली, तर हातावर पोट असणऱ्या गरिबांची काय अवस्था असेल. या आंदोलनातच सर्व ताकद आहे; पण येथे प्रश्न ताकदीचा नसून इच्छाशक्तीचा आहे. या राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीच नाही. आपल्याकडे लोकशाही आहे, राजेशाही असती तर या सगळ्यांना जवळपास ही पोचून दिले नसते. त्यांनी ढिगाने पैसे खाल्ले मग लसीकरणाला का पैसे मिळत नाहीत. ज्यांना लस मिळाली ते आता कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. हा बाजार या बाजार बुणग्यांणी मांडला आहे. कोण हा वाझे, त्याच्याकडे ऐवढे पैसे आले कोठून हेच मला समजत नाही.''
 
पैसे किती खायचे तेवढे खावा. खाली पडतंय तरी खाताय. आजपर्यंत कोणत्याही शास्त्रज्ञांनी लॉकडाउनबाबत वक्तव्य केलेले नाही. शास्त्रज्ञांनी सांगितले तरच लॉकडाउन करा. तुमचे काळे कारनामे लपविण्याकरिता लॉकडाउन करता का? पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांची अवस्था काय आहे. पोलिस त्यांनाच अडवतात. एसपींपासून आयजीपर्यंत सर्व पोलिसांना माझे सांगणे आहे, की आम्ही टॅक्‍स भरतो म्हणून तुमचे पगार होतात. तुम्ही शासनाचे नोकर आहात. कधीही लॉकडाउन करायला तुमच्या बापाची इस्टेट आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Video पाहा : उदयनराजेंनी जबाबदारीने वागले पाहिजे
 
लशीचा पुरवठा व्यवस्थित न करता पैसे खातात. वाझे प्रकरणात कोणाला किती पैसे पोच झाले हे समजले पाहिजे. एक मेला तर चालेल, पण लाख जगले पाहिजेत; पण त्यांना ते स्वतः जगले पाहिजे, लाख मेले तरी चालेल, अशी राज्यातील परिस्थिती आहे. मी हे सर्वसामान्यांच्या बाजूने बोलत असल्याचे स्पष्ट करत जिल्हा प्रशासन स्वतःला लय शहाणे समजत आहे, असा शब्दात त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांवर टीका केली.

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या काेराेनावरील वक्तव्याचा शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला समाजार, काय म्हणाले राजे वाचा सविस्तर

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top