

BJP Eyes Top Spot in ZP, Panchayat Samiti Polls; High-Level Strategy Meet Held
Sakal
कऱ्हाड: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी भाजपने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात भाजपच नंबर एक ठरण्याची रणनीती आखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज येथे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नगरपालिका, नगरपंचायत, महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही सर्वाधिक संख्येने भाजपचे कमळ फुलवा, असा कानमंत्र पदाधिकाऱ्यांना दिला.