esakal | 12 आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप आक्रमक; साताऱ्यात ठाकरे सरकारचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Satara BJP

महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि 12 आमदारांना निलंबित केलं.

12 आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप आक्रमक

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : भाजपच्या 12 आमदारांच्या (BJP MLA) निलंबनाच्या निषेधार्थ आज साताऱ्यात भाजपने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) नेते, मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे सरकारचा जाहीर निषेध नोंदवला. साताऱ्यातील पोवई नाका येथे हे आंदोलन करण्यात आले. (BJP Suspends 12 MLA BJP Agitation Against Thackeray Government In Satara Satara Political News)

महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि 12 आमदारांना निलंबित (BJP Suspends 12 MLA) केलं. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे. सोमवारी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन झाल्याने त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. आज (मंगळवार) त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यात भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला.

हेही वाचा: Satara Lockdown : 'प्रशासन नागरिकांच्या आत्‍महत्‍येची वाट बघतंय का?'

ठाकरे सरकारने (Thackeray government) 12 आमदारांचं निलंबन केल्याने आक्रमक झालेल्या भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बोंबाबोंब आंदोलन करत लोकशाहीच्या गळचेपी करणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या. या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग पहायला मिळाला. दरम्यान, यावेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील (BJP leader Suvarna Patil) म्हणाल्या, अधिवेशनाच्या पहिल्या तासाभरातच ओबीसींच्या आरक्षणासंबंधीचा ठराव राज्य सरकारकडून मांडण्यात आला. त्यातील तरतुदींवर आक्षेप घेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे (Bharatiya Janata Party) सर्व आमदार त्यांचे म्हणणे मांडत होते. मात्र, त्यांचे कोणीही ऐकून न घेता, त्यास विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे सदरचा ठराव गोंधळातच मंजूर करण्यात आला. परंतु, सरकारने आमदारांचं निलंबन करुन एकप्रकारे लोकशाहीचा खूनचा केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

BJP Suspends 12 MLA BJP Agitation Against Thackeray Government In Satara Satara Political News

loading image