esakal | Satara Lockdown : 'प्रशासन नागरिकांच्या आत्‍महत्‍येची वाट बघतंय का?'
sakal

बोलून बातमी शोधा

Vedantikaraje Bhosle

लॉकडाउनला विरोध दर्शविण्‍यासाठी सातार्‍यातील व्‍यापार्‍यांनी पुकारलेल्‍या आंदोलनास वेदांतिकाराजे भोसले यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

Satara Lockdown : 'प्रशासन नागरिकांच्या आत्‍महत्‍येची वाट बघतंय का?'

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : गेले तीन महिने सातारा येथील बाजारपेठा लॉकडाउनमुळे (Strict lockdown) ठप्‍प आहेत. व्‍यवसाय ठप्‍प असले तरी त्‍यासाठी काढलेल्‍या कर्जाचे व्‍याज इतर शासकीय देणी सुरु आहेत. शासनाने कर्जावरील व्‍याज आणि शासकीय देणी माफ करावीत, अशी मागणी करत कर्तव्‍य सोशल ग्रुपच्‍या संस्‍थापिका वेदांतिकाराजे भोसले (Vedantikaraje Bhosle) यांनी सातार्‍यातील लॉकडाउन हटविण्‍याची मागणी आज केली. (Strict lockdown 2021 Vedantikaraje Bhosale Support To The Traders Movement Satara Marathi News)

लॉकडाउनला विरोध दर्शविण्‍यासाठी सातार्‍यातील व्‍यापार्‍यांनी पुकारलेल्‍या आंदोलनास पाठिंबा दर्शवत वेदांतिकाराजे भोसले यांनी लॉकडाउनच्‍या अनुषंगाने काही प्रश्‍‍न उपस्‍थित केले. त्‍या म्‍हणाल्‍या, गतवर्षी देशव्‍यापी लॉकडाउन पुकारण्‍यात आला होता. यानंतर तो राज्‍य आणि जिल्‍हापातळीवरील परिस्‍थीतीचा विचार करुन अजूनही सुरुच आहे. लॉकडाउन हा पर्याय नाही. गेले तीन महिने सातार्‍यातील व्‍यवहार बंद असून त्‍यामुळे व्‍यापारी, कामगार, हातावर पोट असणार्‍यांची ओढाताण होत आहे.

हेही वाचा: साताऱ्यात लाॅकडाउनविरोधात व्यापारी आक्रमक

सध्‍यस्‍थितीत इतर ठिकाणचे व्‍यवहार सुरळीत असताना येथेच का लॉकडाउन पुकारण्‍यात आले आहे, हे न समजण्‍यासारखे आहे. या लॉकडाउनमुळे सांगा जगायचे कसे हा प्रश्‍‍न निर्माण झाला असून सर्वच गोष्‍टी हाताबाहेर जात आहेत. लॉकडाउनमुळे नैराश्‍‍यातून अनेक आत्‍महत्‍या घडत असताना जिल्‍हा प्रशासनाची तशीच इच्‍छा आहे का, हा सवाल उपस्‍थित होत आहे. आज शांततेच्‍या मार्गाने हे आंदोलन होत आहे, यापुढील काळात त्‍याचे स्‍वरुप बदलू शकते. त्‍यामुळे जिल्‍हा प्रशासनाने परिस्‍थितीचा गांभीर्यपुर्वक विचार करत पुकारलेला लॉकडाउन मागे घेण्‍याची गरज असल्‍याचे मतही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

Strict lockdown 2021 Vedantikaraje Bhosale Support To The Traders Movement Satara Marathi News

loading image