

BJP leaders announce decision to contest Satara Municipal Elections on the lotus symbol; interviews for candidates begin today.
Sakal
सातारा: पालिकांसह आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ‘कमळ’ चिन्हावरच लढण्याचा निर्णय आज झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. पालिकांसाठी उद्या (रविवार)पासून दोन दिवस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. दोन दिवसांनंतर त्यांचा अहवाल प्रदेशकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित केली जातील, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.