
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्याचा कॉंग्रेसचा डाव; भाजपचा आरोप
कऱ्हाड (सातारा) : कोरोनाचा (Coronavirus) प्रभाव वाढल्याने शासनाला सहकार्याच्या निःस्वार्थी भावनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मदतीला रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीवर कऱ्हाडला युवक कॉंग्रेसने (Congress) घेतलेला आक्षेप निषेधार्ह आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pawaskar) यांनी केली. (BJP Vikram Pawaskar Criticizes Congress Shivraj More Satara News)
युवक कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे (Shivraj More) यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात संघाच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले. त्याला प्रतिउत्तर पावसकर यांनी दिले. ते म्हणाले, "कऱ्हाडमध्ये वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाची परवानगी घेऊन लसीकरण केंद्रावर तीन दिवस स्वयंसेवक कार्यरत होते. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला मदत केली होती. ते स्वतःचा जीव धोक्यात घालून गर्दी नियंत्रण, नावनोंदणीसाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य केले. ते काम आजही करत आहेत.
माणुसकीला काळीमा! मृताचा चेहरा दाखविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून शे-पाचशेंची मागणी
मात्र, काही राजकीय पुढारी संघाची बदनामी करायचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नागरिकांशी वाद झाल्याचा बनाव करून निःस्वार्थी सेवाकार्य थांबवण्याच्या उद्देशाने संघाला टार्गेट करण्याचा प्रकार कऱ्हाडला झाला आहे. संघाची तक्रार करून त्यांचे काम बंद पाडण्यासाठीच उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट द्यावी. तेथे नियोजनाअभावी झालेली दुरवस्था पाहावी. ''
Corona काळात कामगारांचा जीव धोक्यात; नरेंद्र पाटलांची राज्यपालांकडे धाव
BJP Vikram Pawaskar Criticizes Congress Shivraj More Satara News
Web Title: Bjp Vikram Pawaskar Criticizes Congress Shivraj More Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..