Chandrashekhar Bawankule: सातारा जिल्ह्यातील आठ पालिकांत भाजपची सत्ता येईल: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मित्रपक्षांमधील मतभेदबाबत माेठं वक्तव्य !
BJP Satara elections: साताऱ्यातील आठही पालिकांमध्ये भाजपकडे संघटनात्मक बळ, नेतृत्व, निवडणूक रणनीती आणि जनतेत वाढती स्वीकारार्हता असल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.
वाई : पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळेल. दोन तृतीयांश बहुमत मिळून वाईसह आठ पालिकांमध्ये पक्षाची सत्ता येईल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.