

New members from Umbraj, Pal, and Masur join BJP in Karad North during a local event to strengthen the party organization.
Sakal
काशीळ : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कऱ्हाड तालुक्यातील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या प्रवेशामुळे माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का बसला आहे.