

Political Shift in Satara: Suvarna Patil Leaves BJP, Joins NCP
Sakal
सातारा: भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पालिकेत भाजपच्या दोन्ही राजेंच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारापुढे आव्हान निर्माण केले आहे.