
Koyna water transport set for revival — government approves funds for launch repairs and staff honorarium
Sakal
सातारा: कोयना जलाशयाच्या पाणीसाठ्यामुळे बाधित झालेल्या गावांतील नागरिकांच्या दळणवळण व संपर्कासाठी शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्या तापोळा (ता. महाबळेश्वर) येथील जलवाहतुकीसाठी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी, तसेच बार्च, लॉन्चेसच्या इंधन व देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी आॅक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी ३५ लाख ५३ हजार ३१० रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी मदत व पुनवर्सनमंत्री मकरंद पाटील यांनी प्रयत्न केले होते. या निर्णयामुळे कोयना जलाशयाच्या परिसरातील लोकांना समाधान व्यक्त केले.