Border Dispute : सीमाप्रश्‍नी मोदींची मध्यस्थी हवी - उदयनराजे भोसले

भाषावार प्रांतरचना होणे अपेक्षित होते. पण, ती झाली नाही. सीमावादावर महाजन समिती बसवली, त्याला जमले नाही. त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांची इच्छाशक्ती नव्हती.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Summary

भाषावार प्रांतरचना होणे अपेक्षित होते. पण, ती झाली नाही. सीमावादावर महाजन समिती बसवली, त्याला जमले नाही. त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांची इच्छाशक्ती नव्हती.

सातारा - भाषावार प्रांतरचना होणे अपेक्षित होते. पण, ती झाली नाही. सीमावादावर महाजन समिती बसवली, त्याला जमले नाही. त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांची इच्छाशक्ती नव्हती. केंद्रात पंतप्रधानांनी दोन्ही राज्यांतील प्रमुख पक्षांना निमंत्रित करावे आणि सांगावे. तुमच्या राजकारणामुळे सीमावर्ती भागातील लोकांची प्रगती खुंटत आहे. या प्रश्नाबाबत पंतप्रधानांनी मध्यस्थी करणे गरजेचे आहे, असे आवाहन खासदार उदयनराजे भाोसले यांनी केले.

छत्रपती संभाजीराजे यांचे थोर सुपुत्र स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहूराजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त आज खासदार उदयनराजे यांनी संगम माहुली येथे जाऊन त्यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीबाबतचा मुद्दा मी लावून धरला नसता, तर तो केव्हाच बाजूला पडला असता. उशिरा का होईना आता लोक एकत्र येतायत, ही चांगली गोष्ट आहे.

महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, याविषयी विचारले असता ते म्हणाले, कायदा शिल्लक राहिला आहे का, बलात्काराचा गुन्हा करणारे धनदांडगे पैशाच्या जोरावर सुटतात. त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे. बाहेरच्या देशात कायदे कडक आहेत. आपल्याकडेसुध्दा तसेच कडक कायदे करायला हवेत. चोरी करणाऱ्यांची बोटे छाटली जातील. त्यांना भीतीच राहिली नाही. बलात्कार करणाऱ्यांस कडक शिक्षा करावी. एका बाजूला स्त्रीला आपण आदिशक्ती म्हणतो, तिचा स्वाभिमान जपण्याचं काम आपण केलं पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com