'फायनान्स'च्या कर्मचाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना माजगावात अटक

Crime News
Crime Newsesakal

नागठाणे (सातारा) : माजगाव (ता. सातारा) येथे फायनान्स कंपनीच्या (Finance Company) वसुली कर्मचाऱ्यास लुटणाऱ्या तिघा चोरट्यांना पोलिसांनी २४ (Borgaon Police) तासांच्या आत अटक केली. पोलिसांनी चोरट्यांकडून चोरलेला ऐवज हस्तगत केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश वैजनाथ राख (वय २२, मूळ रा. कुपवाड, सांगली हल्ली रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) यांनी याबाबत काल फिर्याद दाखल केली होती. (Borgaon Police Arrested Three Persons from Karad Satara In A Theft Case Crime News bam92)

Summary

माजगाव (ता. सातारा) येथे फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यास लुटणाऱ्या तिघा चोरट्यांना पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली.

त्यानुसार राख हे काल नेहमीप्रमाणे कर्जाचे हफ्ते गोळा करण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. प्रथम अंधारवाडी (ता. कऱ्हाड) गावात जाऊन त्यांनी वसुलीला सुरवात केली. त्यानंतर खराडे (ता. कऱ्हाड), माजगाव (ता. सातारा) या गावांत जाऊन त्यांनी पैसे गोळा केले. जमा झालेली रक्कम व सॅमसंग कंपनीचा टॅब त्यांनी एका काळ्या बॅगेत ठेवला होता. रक्कम भरण्याकरिता ते उंब्रजला दुचाकीवरून निघाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास माजगाव कमानीच्या अलीकडे रस्त्यामध्ये तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी जबरदस्तीने थांबविली. हे तिघेही अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील होते. त्यांच्यापैकी काळा टी शर्ट घातलेल्या एकाने हातातील बॅग हिसकावून तिघे जण उसाचे शेतातून पळून गेले.

Crime News
कऱ्हाड पालिकेत पतींच्या उचापतींवरून हमरीतुमरी

या प्रकरणी गणेश राख यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात (Borgaon Police Station) फिर्याद दाखल केली होती. त्यातील चोरट्यांच्या वर्णनानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ (Assistant Inspector of Police Dr. Sagar Wagh) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर, नितीन महाडिक, किरण निकम, विजय साळुंखे, विशाल जाधव, प्रकाश वाघ, राहुल भोये, कपिल टिकोळे, अमित पवार, उत्तम गायकवाड यांच्या पथकाने त्वरेने हालचाली केल्या. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघा चोरट्यांना गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलीसह अटक केली. चोरीस गेलेला ऐवजही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधिकारी धीरज पाटील, आंचल दलाल आदींनी पोलिस पथकाचे अभिनंदन केले आहे.

Borgaon Police Arrested Three Persons from Karad Satara In A Theft Case Crime News bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com