

Maharashtra Bori Bar Tradition Explained Women Gather Across Stream To Exchange Abuses And Celebrate Shravan Festival
sakal
लोणंद : नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी बोरी व सुखेड येथे भरणारा बोरीचा बार यंदाही आज पाऊण तास भरला. यावेळी बार घालण्यासाठी ओढ्याच्या दोन्ही तीरांवर उपस्थित महिलांनी एकमेकींना हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहिली. त्यानंतर दोन्ही गावांतील महिलांनी एकमेकींसोबत झिम्मा, फुगडी, फेर आदी पारंपरिक खेळ तसेच पारंपरिक गाणी गात श्रावणाचा आनंद लुटला.