esakal | तब्बल दीड वर्षांनंतर माउलीच्या दर्शनाने भाविकांच्या डोळ्यात 'आनंदाश्रू' I Samadhi Temple
sakal

बोलून बातमी शोधा

Samadhi Temple

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिरे देखील गेल्या दीड वर्षांपासून बंद होती.

तब्बल दीड वर्षांनंतर माउलीच्या दर्शनाने भाविकांच्या डोळ्यात 'आनंदाश्रू'

sakal_logo
By
फिरोज तांबोळी

गोंदवले (सातारा) : तब्बल दीड वर्षानंतर प्रत्यक्ष माउलीच्या दर्शनाने धन्य झालेल्या भाविकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. आज गोंदवल्यातील समाधी मंदिर (Samadhi Temple Gondavale Budruk) उघडल्याने श्रींच्या ओढीची आस पूर्ण झाली. शिस्तीचे पालन करत भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिरे देखील गेल्या दीड वर्षांपासून बंद होती. शासनाने परवानगी दिल्यानंतर आज घटस्थापनेदिवशी (Navratri Festival 2021) बंद मंदिरांचीद्वारे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत.

गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर (Brahmachaitanya Maharaj Samadhi Temple) देखील आज भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव आता थंडावला असला, तरी समाधी मंदिर समितीने भाविकांची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न केलाय. शासनाच्या नियमांचे पालन करत भाविकांना दर्शन दिले जात आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातच स्वयंचलित यंत्रणा उभारून सॅनिटायझर व तापमान घेऊनच आज भाविकांना प्रवेश दिला जात होता. मंदिरात पुजाऱ्यांकडून नियमित धार्मिक विधी केले जात आहेतच. परंतु, भाविकांसाठी सकाळी नऊ ते बारा व सायंकाळी चार ते आठ वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतलाय.

हेही वाचा: नवरात्रोत्सवात तरुणाईला गरब्यात थिरकण्यास बंदी

Samadhi Temple Gondavale Budruk

Samadhi Temple Gondavale Budruk

आज सकाळी नऊ वाजल्यापासून भाविकांनी शिस्तीचे पालन करत श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. समाधी मंदिरातील सभामंडपात भाविकांना प्रवेश दिला जात होता. शिवाय, मंदिराच्या बाहेरील बाजूने देखील मु्ख्य दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांसाठी निवास व प्रसादाची व्यवस्था मात्र अद्यापही बंदच आहे. भाविकांसाठी मंदिर खुले झाल्याने परिसरातील व्यापाऱ्यांमधूनही चैतन्याचे वातावरण दिसत होते. मोठ्या उत्साहात आज व्यापाऱ्यांनी दुकाने सज्ज केली आहेत.

हेही वाचा: चिपी विमानतळ : मुख्यमंत्र्यांची केंद्रीयमंत्र्यासोबत आज महत्वपूर्ण बैठक

loading image
go to top