

Anti-Corruption Bureau arrests Extension Officer and Operator in Mahabaleshwar for demanding a ₹15,000 bribe.
Sakal
महाबळेश्वर: महाबळेश्वर पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी सुनील पार्टे आणि तालुका व्यवस्थापन विभागातील डेटा एन्ट्री ऑपरेटर ओंकार जाधव यांना १५ हजार व दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.