
Babya Don and Spider steal the spotlight at Satoba Kesari as 400+ bullock carts participate at Takewadi grounds.”
Sakal
दहिवडी: माण तालुक्यातील टाकेवाडी येथे श्री सतोबा यात्रेनिमित्त एक आदत- एक बैल पद्धतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला उदंड प्रतिसाद मिळाला. अतिशय रोमांचक ठरलेल्या या मैदानात माणगंगा एक्स्प्रेस नावाने पळलेल्या गाडीचे आंधळी- शिंदीकरांचा ‘बब्या डॉन’ व शिरसवडीकरांचा ‘स्पायडर’ ही जोडी सतोबा केसरीची मानकरी ठरली.