
ओगलेवाडी: सैदापूर (ता. कऱ्हाड) येथील गजानन हौसिंग सोसायटीत भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद घरांची कुलपे तोडून सुमारे ६० हजारांची रोकड व चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू लंपास केल्या. काल भरदुपारी चोरीच्या घटना घडल्याने रहिवाशांत भीती पसरली आहे.