

Padali murder case exposed: Police inspecting the spot where the burnt body was discovered.
Sakal
सातारा : जुन्या वादाच्या कारणावरून पाडळी (ता. सातारा) येथील संभाजी बाळू शेलार (वय ४३) यांचा धारदार शस्त्राने खून करत मृतदेह जाळून टाकल्याच्या गुन्ह्याची उकल तब्बल पाच महिन्यांनी करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांना यश आले. या खूनप्रकरणी पोलिसांनी भरत ऊर्फ मधू रंगराव ढाणे (वय ४८, रा. पाडळी) याला अटक करण्यात आली आहे.